शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

सोशल मीडियावर शशी कपूरऐवजी शशी थरूर यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:08 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं.

ठळक मुद्दे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काहींनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही श्रद्धांजली वाहिली.

मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेते शशी कपूर यांचं सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली, पण श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काहींनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या कार्यालयात सांत्वन करणारे फोन येऊ लागल्यानंतर शेवटी कंटाळून शशी थरूर यांनी ट्विट करत माझ्या मरणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी मी ठणठणीत बरा आहे, अशा आशयाचं ट्विट करत लोकांना चूक निदर्शनास आणून दिली.

 एका इंग्रजी वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शशी कपूर यांच्याऐवजी शशी थरूर यांच्या निधनाची बातमी दिली. यामुळे सगळा घोळ झाला. ट्विटरवरील त्याबातमीनंतर शशी थरूर यांच्या कार्यालयात अनेकांनी फोन केले. शेवटी ट्विट करत ‘मी ठणठणीत बरा आहे, माझ्या कार्यालयात अनेक पत्रकारांचे फोन येत आहे. सांत्वन करणारेही फोन येत आहे. पण, मी अजूनही जिवंत आहे. मला वाटतं आता फक्त माझ्या शरीराचा एक भाग निकामी झाला आहे. एका चांगल्या, देखण्या चतुरस्त्र अभिनेत्याचं आज निधन झालं, माझं आणि त्यांचं नाव एकसारखं असल्यानं नेहमीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण, मला शशी कपूर यांची आठवण नेहमीच येत राहिल.’ अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी आपल्या निधनाच्या बातमीला पूर्णविराम लावला.

अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, शशी कपूर यांनी १६0 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी १२ चित्रपट इंग्रजी भाषेतील आहेत. नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही.कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्यानंतर ते काहीसे खचले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली. तेव्हापासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. २0११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २0१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

टॅग्स :Shashi Kapoorशशी कपूरShashi Thaoorशशी थरुर