शारदा घोटाळा- आसामच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची चौकशी
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
कोलकाता- कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी आसामचे माजी मंत्री हिमांशु शर्मा यांच्या पत्नी रिंकी शर्मा यांचा जाबजबाब नोंदविला.
शारदा घोटाळा- आसामच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची चौकशी
कोलकाता- कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी आसामचे माजी मंत्री हिमांशु शर्मा यांच्या पत्नी रिंकी शर्मा यांचा जाबजबाब नोंदविला. ईडीच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, शारदा समूहाचे अध्यक्ष सुदीप्त सेन यांच्यासोबतच्या व्यावसायिक करारांबद्दल रिंकी शर्मा यांना विचारपूस करण्यात आली. आणि या व्यावसायिक देवाणघेवाणीची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. ईशान्येतील काही टीव्ही वाहिन्या रिंकी यांच्या मालकीच्या आहेत. आणि शारदा समूहाच्या जाहिराती त्यावर प्रसारित करण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते. (वृत्तसंस्था)