शारदा घोटाळा: माजी पोलीस महासंचालकास सशर्त जामीन
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
कोलकाता- कोलकाता उच्च न्यायालयाने कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे माजी पोलीस महासंचालक (सशस्त्र पोलीस) रजत मजुमदार यांना सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.
शारदा घोटाळा: माजी पोलीस महासंचालकास सशर्त जामीन
कोलकाता- कोलकाता उच्च न्यायालयाने कोट्यवधीच्या शारदा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे माजी पोलीस महासंचालक (सशस्त्र पोलीस) रजत मजुमदार यांना सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्तीद्वय सुब्रोकमल मुखर्जी आणि इंद्रजीत चॅटर्जी यांच्या खंडपीठाने मजुमदार यांना एक लाख रुपयांच्या हमीवर हा जामीन दिला आहे. याशिवाय त्यांना आपला पासपोर्टही जमा करायचा आहे. न्यायालयाने त्यांना कोलकात्यात आणि बिधननगर पोलीस स्टेशनअंतर्गतच राहण्याचे निर्देश दिले असून आठवड्यातून एकदा सीबीआय समक्ष हजर व्हायचे आहे. मजुमदार यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे ॲड. अनिंद्य मित्रा व मीलन मुखर्जी यांनी सांगितले की, मजुमदार यांचा या घोटाळ्यात सहभाग सिद्ध करणारे कुठलेही पुरावे सीबीआय सादर करू शकलेली नाही. तर सीबीआयच्या वकिलांनी मात्र मजुमदार यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. (वृत्तसंस्था)