शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:11 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.ममता बॅनर्जी यांच्या एका पत्राचे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की, आपली लोकशाही वाचविण्यासाठी आणि हुकूमशाही शासनाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कोणत्याही योजनेत स्वत:ला सहभागी करून घेण्यात मला आनंद होईल. देशाला वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.ममता बॅनर्जी यांनी काय म्हटले आहे पत्रात?ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना २३ डिसेंबर रोजी हे पत्र लिहिले आहे.यात भाजपचे शासन हे कठोर शासन असल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की, आज आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक एकजूटपणे या कठोर शासनाविरोधात उभे राहण्याची गरज आहे.मी सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्षांना विनंती करते की, शांततेने विरोध करून भारताच्या लोकशाही आत्म्याला वाचवा.देशातील अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काळजी व्यक्त करून म्हटले आहे की, या देशाचे नागरिक जात आणि पंथ व महिला व मुले, शेतकरी, कामगार आणि अनुसूचित जाती, जमातीचे नागरिक, ओबीसी आणि अल्पसंख्याक सदस्य हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीमुळे घाबरलेले असून, भीतीच्या छायेत आहेत.शरद पवार यांनी म्हटले आहे की, हा कायदा धार्मिक, सामाजिक एकतेला नुकसान पोहोचवेल. त्यांनी असाही सवाल केला आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी परवानगी दिली आहे. मात्र, श्रीलंकेच्या तामिळींना नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी