शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 08:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली :  

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेस, डावे, आम आदमी पार्टीसह सर्व विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, शरद पवार हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर पवार यांनी नकार दिल्यास विरोधी पक्ष राष्ट्रपती पदाचा उमेदवार शोधत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याची शक्यता पडताळण्याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी बोलल्या आहेत. सूत्रांनुसार त्यांनी शरद पवार यांना विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार बनविण्याबाबतही आग्रह केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत आम आदमी पार्टीही उपस्थित राहणार आहे. विरोधी पक्ष संयुक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असून, पवारांना उमेदवारी देण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, ते राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

डावे पक्ष आज पवारांना भेटणारसीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही १५ जून रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे मतभेद मिटले का, असे  विचारले असता,  ते म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षाच्या ऐक्यासाठी हे करीत आहोत. डावे पक्ष मंगळवारी शरद पवार यांची भेट घेणार असून, राष्ट्रपती पदाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

...म्हणून पवार अनुत्सुकराष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, पवार साहेब हे राजकारणात सक्रिय आहेत. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांचा विचार नाही. ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसतील.  पराभवासाठी ते  कधीच निवडणूक लढविणार नाहीत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमतासाठी १५०० मते कमी आहेत.  बीजेडी,  वायएसआर काँग्रेस, टीआरएस आणि अन्य छोट्या पक्षांच्या भूमिकेचा  अंदाज नसल्याने पवार जोखीम घेणार नाहीत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPresidentराष्ट्राध्यक्ष