शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar BIG BREAKING: दिल्लीत शरद पवारांनी घेतली मोदींची वन-टू-वन भेट; २५ मिनिटं खलबतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:42 IST

देशाच्या राजधानीत आज दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Naredra Modi यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार Sharad Pawar यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. (प्रातिनिधिक फोटो)

नवी दिल्ली-

देशाच्या राजधानीत आज दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार Sharad Pawar यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भेट झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही बैठक वन-टू-वन बैठक होती. या बैठकीत इतर कोणतेही नेते उपस्थित नव्हते. दोघांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी व सत्ताधारी-विरोधकांमध्ये सुरू असलेली कुरघोडी पाहता या भेटीच्या 'टायमिंग'ला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. कालच राज्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई करत त्यांची अलिबाग जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला आहे. त्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यातील भेट यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पवारांनी थेट मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

भेटीच्या 'टायमिंग'वर चर्चेला उधाणपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील शेवटची भेट गेल्यावर्षी १७ जुलै रोजी झाली होती. त्यानंतर थेट आज दोन्ही नेते भेटले आहेत. दरम्यानच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर मोदींनी केलेलं भाषण. त्यात मोदींनी पवारांवर नाव न घेता केलेली टीका अशी पार्श्वभूमी आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेली कारवाई आणि त्यावर पवारांनी थेट केंद्राला लक्ष्य केलं आहे. 

दिल्लीत कालच पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय आमदारांना चहापानासाठी बोलावण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपाचेही आमदार उपस्थित होते. पण संजय राऊत यांनी भाषणासाठी माईक हातात घेताच भाजपाच्या आमदारांनी काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राज्यातील नाराज काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यात नाराज आमदारांनी सोनियांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आहे. सोनियांनीही आमदारांची संपूर्ण बाजू ऐकून घेत योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच सोनियांनी राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला प्राधान्य दिलं जातं का? असा महत्वाचा प्रश्न विचारुन आमदारांचं मत जाणून घेतलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी