शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराच्या धक्क्याने शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन,राष्ट्रपती व पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:45 IST

कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.

कांचीपूरम (तामिळनाडू) : कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती स्वामीगल (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे बुधवारीच कामाक्षी अम्मन मंदिराजवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती व पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले.गेल्या जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. कांची कामकोटी पीठाचे ते १९९४ मध्ये ६९ वे शंकराचार्य बनले. कांचीपीठाचे पुजारी म्हणून जयेंद्र सरस्वती यांची नियुक्ती झाली त्यावेळी अवघ्या १९ वर्षांचे होते. देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाºया विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते. कांचीपुरममधील वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४ मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी, २००५पर्यंत ते तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३ मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना त्यातून निर्दोष मुक्त केले.''सरस्वती यांच्या निधनाच्या वृत्ताने मला तीव्र वेदना झाल्या. आपले उदात्त विचार आणि अतुलनीय सेवेमुळे ते लक्षावधी भाविकांच्या हृदयात कायम राहतील. जयेंद्र सरस्वती यांनी गरजू आणि तळागाळातील लोकांची आयुष्ये सुधारण्यासाठी संस्थांची जोपासना केली व समाजाची सेवा करण्यासाठी ते आघाडीवर असायचे.''- नरेंद्र मोदी, पंतप्रधान''मोक्ष प्राप्त केलेले जयेंद्र सरस्वती यांना माझा प्रणाम. मानवतेच्या कल्याणासाठी आणि अध्यात्माच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतील.''- वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती''जयेंद्र सरस्वती यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर मला दु:ख झाले. शंकराचार्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगभर त्यांना लक्षावधी अनुयायांकडून सन्मान मिळाला आहे. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो.''- राहुल गांधी,काँग्रेस अध्यक्ष