शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

Shaheed Diwas : भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या हौतात्म्याला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 11:47 IST

आज शहीद दिवस. 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती.

नवी दिल्ली - आज शहीद दिवस. 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. शहीद दिवस म्हणून ओखळला जाणार हा दिवस खरंतर भारतीय इतिहासासाठी एक काळा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.  

काय झाले होते फाशीच्या दिवशी?23 मार्च 1931रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिका-यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा... आधी एका क्रांतिकारकाला दुस-या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली.

फासावर जाताना तिघंही देशभक्ती गीत गात होते....

मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे

मेरा रंग दे बसन्ती चोला। माय रंग दे बसन्ती चोला।।

कोण होते भगत सिंग ?28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे आर्यसमाजातील एका कुटुंबात भगत सिंग यांचा जन्म झाला होता.  स्वातंत्र्याची लढाई लढण्यात सहभागी होणा-या प्रमुख कुटुंबांपैकी त्यांचे एक कुटुंब होतं. ज्यावेळी भगत सिंग यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांच्या वडील व काकांची कारागृहातून सुटका झाली होती.  भगत सिंग यांच्यावर लहानपणीच देशप्रेमाचे संस्कार करण्यात आले होते. त्यांचे वडील व काका गदर पार्टीचे सदस्य होते. गदर पार्टीचे नेते हरदयाल आणि कर्तार सिंग सराभा हे त्यांचे आदर्श होते. 1923 मध्ये भगत सिंग यांनी लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आपल्या साथीदारांसोबत मिळून त्यांनी 1926 साली नौजवान भारत सभेची स्थापना केली. यानंतर ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये प्रमुख सदस्य म्हणून सहभागी झाले. सॉन्डर्स हत्याप्रकरणी सुखदेव, राजगुरू आणि भगत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  

 

टॅग्स :Shaheed Diwasशहीद दिवसBhagat Singhभगतसिंग