शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी एसईझेडच्या धर्तीवर सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 05:47 IST

जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंंॆपन्यांना विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एसईझेड) धरतीवर सवलती देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

- संतोष ठाकुरनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंपन्यांना विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एसईझेड) धरतीवर सवलती देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. यामध्ये दीर्घकाळ टॅक्समध्ये सवलतीचाही समावेश असेल. याची रुपरेखा तयार करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच औद्योगिक क्षेत्रातील मंडळींशी चर्चा करणार आहे.जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर वेगाने विकासासाठी सरकारवर सातत्याने दबाव टाकला जाईल. त्याच कारणाने प्रथमच याठिकाणी गुंतवणूक परिषद आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचवेळी पहलगाम व गुलमर्गला विशेष औद्योगिक क्षेत्र म्हणूनही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, उत्पादन सुरू केल्यानंतर त्याच्या दळणवळणावर लागणारा कर, इतर सोयीसुविधांवर लागणारा कर आदींमध्ये खास सवलत देण्याची मागणी गुंतवणुकदार करीत आहेत. यावर विचार करण्यासाठी सरकारने एक औपचारिक बैठक बोलावून चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये येणाºया उद्योगांमध्ये स्थानिकांसाठी नोकरीतील आरक्षणाची तरतूदही लागू होऊ शकते. जेणेकरून रोजगार वाढेल व विकासामध्ये स्थानिकांची भागिदारीही राहील. सरकारच्या अजेंड्यावर अनेक योजना असल्या तरीही उद्योग आणण्यासाठी गुंतवणुकदारांना कसे आकर्षित करायचे, हे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय स्थानिकांना नोकरीच्या आरक्षणाची तरतूद केवळ जम्मू-काश्मीरसाठीच असेल, हे इतर राज्यांना समजावून सांगणे सरकारसाठी सर्वांत अवघड बाब ठरणार आहे.‘पोस्टर बॉय’चे भय कशाला? : चिदंबरमशाह फैजल याला काश्मीरला परत का पाठवले, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारला केला आहे. ‘काही वर्षांपूर्वी शाह फैजलने आयएएसमध्ये स्थान प्राप्त केले तर सरकारने त्याला आपला ‘पोस्टर बॉय’ केले होते. आता तोच फैजल जनतेच्या सुरक्षेसाठी धोकादायक कसा ठरतो,’ असा सवाल त्यांनी टिष्ट्वटरद्वारे केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGovernmentसरकार