ंसातवड ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
करंजी : पाणी विकणार्या शेतकर्यांवर कडक कारवाई करावी, या शेतकर्यांची विहीर प्रशासनाने अधिग्रहण करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील सातवड ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
ंसातवड ग्रामस्थांचे उपोषण
करंजी : पाणी विकणार्या शेतकर्यांवर कडक कारवाई करावी, या शेतकर्यांची विहीर प्रशासनाने अधिग्रहण करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील सातवड ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.सातवड गाव कृषी विभागाने कोरडवाहू योजनेत समाविष्ट केले आहे. गावातील शेतकरी साठ टक्के शेती ठिबक सिंचनाव्दारे करतात. गावाच्या बाजुने क्रॉक्रीट बंधारे बांधल्याने जागोजागी पाणी अडविल्याने येथील विहिरींमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. गावात पॉलिहाऊस, शेडनेटच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातवड गावातील मुख्य बंधार्याजवळील एका शेतकर्याने विहिरीचे पाणी बाहेरील शेतकर्यांना विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. रोज सुमारे पाच लाख लीटर पाणी या शेतकर्याकडून विकले जात असल्याचा आरोप सरपंच संभाजी वाघ यांनी केला. पाण्याची विक्री न करता पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा, अशी सातवड येथील शेतकर्यांची भूमिका आहे. पाणी विकणारे शेतकरी कान्होबावाडी येथील असून या शेतकर्यामुळे गावातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीतीही या शेतकर्यांनी व्यक्त केली.कान्होबावाडी येथे सध्या तीव्र पाणी टंचाई असताना सातवड ग्रामस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून गावाला कायमस्वरुपी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. मात्र काहीजण पाण्याची मोठ्या प्रमाणावर विक्री करीत असल्याने उपोषणास बसण्याची वेळ आल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. सोमवारी दुपारपर्यंत एकही अधिकारी उपोषणस्थळाकडे न फिरकल्याने मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला. शेवगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील लखमापुरीचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी रिपाइंच्या आठवले गटाचे तालुका सचिव शरद चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शेवगाव तालुक्यात २९ गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर जाहीर झालेल्या सुधारित यादीत पहिल्या टप्प्यात क्रमांक एकवर समाविष्ट असलेल्या लखमापुरीचा समावेश नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.लखमापुरी गावात तसेच नजीकच्या फुंदे वस्ती, गाडे वस्ती, दहिफळे वस्ती, डोंगरे वस्ती या दोन हजार लोकवस्तीच्या व नजीकच्या वाड्या, वस्त्यांवर