शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

लैंगिक शोषण : मंत्र्यांची समिती नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:12 IST

नवी दिल्ली : मी टू मोहिमेच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे हे प्रकार ...

नवी दिल्ली : मी टू मोहिमेच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे हे प्रकार कसे थांबवता येतील, याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे ठरविले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच केंद्रातील महिला मंत्र्यांचा त्यात समावेश असेल. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी याआधीच हा विषय गांभीर्याने घेत, संबंधित कायदा अधिक मजबूत करण्यासंदर्भात न्यायाधीश व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.मनेका गांधी व केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी कामाच्या ठिकाणी होणाºया महिलांच्या लैंगिक छळाचा प्रश्न मंत्रिमंडळात लावून धरला आहे.बदनामीची चिंतापंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बेटी बचाव, बेटी पढावची घोषणा देत असताना, देशात महिलांवर लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होतच आहेत, असे आढळून आले आहे. परराष्ट्रमंत्री एम. जे. अकबर यांना बुधवारी आणि त्याआधी निहालचंद मेघवाल या मंत्र्याला अशाच कारणास्तव जावे लागले होते. त्यामुळे सरकार व भाजपची बदनामी होत आहे, असे मोदी यांचे मत झाले आहे.

‘अकबर यांनी अब्रूनुकसानीचा दावा मागे घ्यावा’महिला पत्रकार प्रिया रमानीविरोधात दाखल अब्रूनुकसानीचा दावा अकबर यांनी मागे घ्यावा, असे आवाहन एडिटर्स गिल्ड या संपादकांच्या संघटनेने केले आहे. प्रिया रमानी यांच्यासह अनेक महिला पत्रकारांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.त्यामुळे अकबर यांना केंद्रातील मंत्रीपद बुधवारी सोडावे लागले आहे.अनेक महिला पत्रकारांनी आरोप केले असले तरी अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरुद्धच अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणात आम्ही साक्ष देण्यास तयार आहोत, असे २0 महिला पत्रकारांनी पत्रक काढून जाहीर केले आहे. त्या २0 पैकी काहींनी आधीच अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

टॅग्स :Metoo Campaignमीटू