शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सर्ईदने पुन्हा ओकली गरळ

By admin | Updated: April 19, 2015 02:13 IST

जिहादचा राग आळवत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धात फुटीरतावादी काश्मिरींना पाठिंबा देण्याचा इरादा स्पष्ट केला

जिहादी राग आळवला : भारताला काश्मीर सोडण्यास भाग पाडू; फुटीरवाद्यांना पाठिंबालाहोर : जिहादचा राग आळवत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धात फुटीरतावादी काश्मिरींना पाठिंबा देण्याचा इरादा स्पष्ट केला. ‘‘फुटीरवादी नेता मसरत आलमने पाकिस्तानी ध्वज फडकवून काहीही गैर केले नाही. श्रीनगर हा वादग्रस्त भाग आहे. तेथे पाकिस्तानच्या बाजूने नारेबाजी करणे गुन्हा कसा होऊ शकतो?’’ अशी प्रक्षोभक विधाने सईद करीत असतानाच काश्मीर खोऱ्यात हुरियतच्या जहाल गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारीही हिंसक वळण घेतले. बडगाम जिल्ह्यात निदर्शनादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केलेल्या गोळीबारात एक युवक ठार तर दोघे जखमी झाले. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने दिले आहेत.एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हाफिज सईदने शब्दागणिक भारतविरोधी द्वेष व्यक्त केला. जिहाद हे इस्लामिक सरकारचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानमधील सरकारही याकामी भूमिका घेत आले आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांना पाकिस्तान सरकार आणि लष्कर मदत करीत आहे. काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने काश्मीरमध्ये जिहाद केला जात असल्याचे सांगत त्याने काश्मीरमधील कुरापतींमागे पाकिस्तान सरकार आणि लष्कर असल्याचीच कबुली दिली. कट्टरपंथी झाले आक्रमकपाकिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करणारा फुटीरवादी नेता मसरत आलम याला झालेली अटक आणि त्रालमध्ये गेल्या आठवड्यात दोन तरुणांना ठार करण्यात आल्याच्या विरोधात हुरियतच्या कट्टरपंथी गटाने शनिवारी बंदचे आवाहन केले होते.हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी गुरुवार रात्रीपासूनच नजरकैदेत आहेत.हा लढा अधिक तीव्र करून भारताला काश्मीरचा त्याग करण्यास भाग पाडू. काश्मिरी जनतेचा आवाज दडपण्याचा भारत सरकारने प्रयत्न केल्यास आम्हीही ताकदीनिशी बदला घेऊ.- हाफीज सईदच्जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) अध्यक्ष यासीन मलिक आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना ते नरबलच्या दिशेने आगेकूच करीत असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी मैसूमा येथेच त्यांना अटक केली. च्विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहतीच्या प्रस्तावाविरुद्ध मलिक यांच्यासोबत ३० तासांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी अग्निवेश येथे आले आहेत. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करण्याच्या नावावर लोकांचे विभाजन करण्याची परवानगी आम्ही कदापि देणार नाही, असे मलिक यांनी सांगितले.