चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी
चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी
चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमीनागपूर : तुझा भाऊ माझ्या बहिणीला व्यवस्थित वागवीत नसल्याचा जाब विचारणाऱ्या फिर्यादीस आरोपीने चाकू मारून गंभीर दुखापत केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रोहित दत्ता मोरे (२०) रा. गायत्रीनगर याने आपल्या बहिणीचा दीर सोमेश विश्वनाथ वाकोडे (३०) रा. नंदनवन झोपडपट्टी यास तुझा भाऊ माझ्या बहिणीला नीट वागणूक का देत नाही, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने चिडून रोहितच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. जखमीवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.