शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

सेट टॉप बॉक्स कंपनीही आता बदलता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:11 AM

पोर्टेबिलिटीचे संकेत; वर्षभरात अंमलबजावणीची शक्यता

मुंबई : मोबाइल कंपनीप्रमाणे सेट टॉप बॉक्स कंपनीची सेवा बदलता येणे लवकरच शक्य होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. हा निर्णय अंमलात आल्यास सध्या सेट टॉप बॉक्स कंपन्यांच्या सुरू असलेल्या बेलगाम कारभाराला चाप बसेल, असे बोलले जाते.केबल किंवा डीटीएच कंपनीची सेवा घेतलेल्या ग्राहकांना सध्या सेट टॉप बॉक्समुळे कंपनी बदलण्यात अडथळे येतात. ग्राहकांची होणारी कुचंबणा या निर्णयामुळे दूर होईल. डीटीएच कंपन्या व केबल सेवा पुरवठादारांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे ट्रायला कठीण जाणार आहे.प्रत्येक आॅपरेटरच्या सेट टॉप बॉक्सची तांत्रिक बांधणी वेगळी असल्याने त्यामध्ये दुसऱ्या कंपनीची सेवा देण्यामध्ये पायरसी व इतर तांत्रिक बाबींचा गोंधळ होण्याची शक्यता कंपन्यांकडून वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्सवरून दुसºया कंपनीची सेवा पुरवणे अवघड होणार आहे.त्यामुळे सेट टॉप बॉक्समध्ये सॉफ्टवेअर लागू करण्याऐवजी कोणत्याही कंपनीची सेवा घेता येईल, अशा प्रकारचे सेट टॉप बॉक्स बसवण्याच्या पर्यायावर काम करण्याची गरज शर्मा यांनी वर्तवली. सरकारच्या तांत्रिक सुविधा पुरवणाºया विभागांची मदत घेण्यात येत असून, यामध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. यासाठी लागणारा वेळ अपेक्षेपेक्षा जास्त लागत आहे. मात्र तरीही प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्यात यश मिळेल, असा दावा शर्मा यांनी केला.१६ कोटी ग्राहकांची कुचंबणादेशात १६ कोटी ग्राहकांकडे सेट टॉप बॉक्स सेवा आहे. त्यांना सध्याच्या कंपनीची सेवा बदलण्याची व्यवस्था नाही. नवीन सेट टॉप बॉक्स विकसित केल्यावर जुन्या बॉक्सचे काय करायचे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय