सत्र न्यायालयात निर्दोष, हायकोर्टात सश्रम कारावास
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
काटोलमधील घटना : मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
सत्र न्यायालयात निर्दोष, हायकोर्टात सश्रम कारावास
काटोलमधील घटना : मुलीवर अत्याचाराचा प्रयत्ननागपूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सत्र न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.नारायण चंपतराव चौरे (३७) असे आरोपीचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. दुसरा आरोपी कृष्णा लक्ष्मण चव्हाण (२८) याचा उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना २४ एप्रिल २०१२ रोजी मृत्यू झाला. २३ ऑगस्ट २००१ रोजी दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा दोघांवर आरोप होता. १५ मे २००३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३६६-अ (अल्पवयीन मुलीला गर्भवती करणे) व ३७६-जी (अत्याचार) या आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपी चौरेला भादंविच्या कलम ३७६, ५११ (अत्याचाराचा प्रयत्न) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले होते.