शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर सेसचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:36 IST

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या पुनर्उभारणीसाठी तेथील राज्य सरकारने केंद्राकडे आणखी निधी मागितला आहे.

नवी दिल्ली : पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या पुनर्उभारणीसाठी तेथील राज्य सरकारने केंद्राकडे आणखी निधी मागितला आहे. हा निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार जीएसटीवर देशभरात अधिभार लावण्याच्या विचारात आहे, पण अधिभार लावल्यास वेगवेगळ्या वस्तुंवरील कर व परिणामी महागाई वाढण्याची भीती आहे.राज्यातील पुनर्वसनाच्या कामासाठी अधिक निधीची गरज असल्याने कर्जाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी केली आहे. सध्या राज्य सरकारांना राज्याच्या जीडीपीनुसार ३ टक्क्यापर्यंत कर्ज घेता येते. केरळचा जीडीपी ७ लाख ७४ हजार कोटी आहे. त्यानुसार, त्यांना अधिकाधिक २३ हजार ४०० कोटींचेच कर्ज घेता येणे शक्य आहे, पण पुनर्उभारणीसाठी किमान ३० हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे ही मर्यादा ४.५ टक्क्यांपर्यंत वाढवून देण्याची मागणी आयझॅॅक यांनी केंद्राकडे केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याला केवळ तत्त्वत: मान्यता दिली आहे.केरळला निधीची नितांत गरज असल्यानेच तो निधी जीएसटीद्वारे उभा करण्याबाबत केंद्राने विचार सुरू केला आहे. त्यासाठी जीएसटीवर देशभर अतिरिक्त अधिभार लावता येईल का? या शक्यतेचा जीएसटी परिषदेने अभ्यास करावा. हा अधिभार मर्यादित काळासाठी असेल. सर्व राज्य सरकारांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन जेटली यांनी केले आहे. जीएसटी परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.दारूवरील शुल्कात वाढ, इंधनदरात दिलासा?वाढत्या इंधनदरांपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्टÑ सरकार विदेशी दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा विचार करीत आहे.राज्यात तयार होणा-या या दारूवरील उत्पादन शुल्कात २०१३ पासून बदल झालेले नाहीत. त्यामुळे या शुल्कात वाढ करुन इंधनावरील व्हॅट किंवा त्यावरील अधिभारात घट करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण यासंबंधीचा प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आला नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वळसा नायर-सिंह यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :GSTजीएसटी