शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Adar Poonawalla : भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावाला म्हणाले, "सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 17:04 IST

Adar Poonawalla : अदर पूनावाला यांनी म्हटले की, जी लस मुलांसाठी तयार केली जाईल, ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीची कोरोना लस आहे.

नवी दिल्ली : पुणेस्थित लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोना व्हायरसवरील लस (Coronavirus Vaccine) सुरू करण्याचा विचार करत आहे, असे कंपनीचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी मंगळवारी सांगितले. अदर पूनावाला यांनी म्हटले की, जी लस मुलांसाठी तयार केली जाईल, ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीची कोरोना लस आहे. कोव्होव्हॅक्स या नावाने कंपनी स्थानिक पातळीवर लस तयार करून उत्पादन करेल, असे त्यांनी सांगितले.

वृत्तसंस्था पीटीआयने अदर पूनावाला यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'आम्ही मुलांमध्ये गंभीर आजार पाहिलेला नाही. सध्या मुलांची काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, आम्ही त्यांच्यासाठी सहा महिन्यांत लस आणू. ही लस तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध असावी, अशी अपेक्षा आहे.'' अदर पूनावाला दिल्लीत एका इंडट्री कॉन्फरन्समध्ये बोलत होते. ते म्हणाले, 'आमच्या कोव्होव्हॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. लसीने तीन वर्षांच्या वयोगटापर्यंत सर्व बाबतीत उत्कृष्ट डेटा दर्शविला आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच होणार आहे.' दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस दिली जात आहे.

याचबरोबर, अदर पूनावाला यांनीही लहान मुलांचे लसीकरण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "हो, मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना लस द्यावी. यामध्ये कोणतेही नुकसान नाही, या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. फक्त सरकारच्या घोषणेची वाट बघा आणि मगच या दिशेने पुढे जाता येईल." सध्या, राष्ट्रव्यापी लसीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकांना ही लस दिली जात आहे. भारतात अनेक टप्प्यांत लसीकरण सुरू झाले. लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला. त्याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

Zydus Cadila ची ZyCoV-D लसीला मंजुरीड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आपत्कालीन वापराच्या प्राधिकरणासाठी (EUA) दिलेली एकमेव लस ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर करण्यात आलेल्या लसींपैकी एक आहे. ही लस अहमदाबाद येथील Zydus Cadila ची ZyCoV-D लस आहे. मात्र, आतापर्यंत या लसीचा देशाच्या लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, DCGI च्या तज्ज्ञ पॅनेलने 12-18 वयोगटासाठी हैदराबादस्थित भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडकडून कोवॅक्सिनची शिफारस केली आहे. मात्र, 'अंतिम मंजुरी देण्यापूर्वी कंपनीकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे', अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस