शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर १ कोटी डोस वाया जातील; 'सीरम'चं आरोग्य मंत्रालयाला पत्र; केली तातडीनं निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 11:03 IST

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासमोर (SII) एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीबाबत एक पेच कंपनीसमोर निर्माण झाला आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासमोर (SII) एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीबाबत एक पेच कंपनीसमोर निर्माण झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे कंपनीनं उप्तादन केलेल्या कोवोवॅक्स लसीच्या (Covovax Vaccine) निर्यातीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यासोबतच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनशी (CDSCO) निगडीत देखील याच लसीचीबाबतची मंजुरी दिली जावी अशी मागणी केली आहे. कोवोवॅक्सच्या निर्यातीबाबत तातडीनं निर्णय घेतला गेला नाही, तर कंपनीला मोठं नुकसान होऊ शकतं असा दावा सीरमनं केला आहे. मंजुरी न मिळाल्या डिसेंबर २०२१ पर्यंत कोवोवॅक्स लसीचे एक कोटी डोस वाया जातील, असं कंपनीनं आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. 

संपूर्ण जगभरात कोरोना विरोधी लढ्यात लसीकरण मोहिमेवर जोर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातून अनेक देश सीरम इन्स्टिट्यूटशी लसींच्या पुरवठ्याबाबतचे करार करत आहेत. एसाच एक करार इंडोनेशिया आणि सीरम इन्स्टिट्यूटमध्ये झाला आहे. इंडोनेशियानं सीरम इन्स्टिट्यूटसोबत एक कोटी कोरोना लसीचे डोस खरेदीचा करार केला आहे. कंपनीनं याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली आहे. कोवोवॅक्सच्या निर्यातीनंतरही देशातील लस पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नाही याचीही हमी सीरमनं पत्रातून दिली आहे. 

भारतात कोवोवॅक्सच्या वापरासाठी मागितली परवानगीकोविशील्ड लशीचा (Covishield Vaccine) अजिबात तुटवडा नाही आणि आवश्यक असा साठा कंपनीकडे उपलब्ध आहे, असा दावा सीरम इन्स्टिट्यूनं केला आहे. या गोष्टींची दखल घेऊन सरकारनं लसीच्या निर्यातीची परवानगी द्यावी अशी विनंती सीरमनं सरकारकडे केली आहे. सीरमनं कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरालाचीही मंजुरी मागितली आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. इंडोनेशियानं मात्र कोवोवॅक्सच्या वापराला मंजुरी दिलेली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या