इटानगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत भूस्खलनासह गंभीर पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे रेल्वेरूळ आणि इमारतींची हानी होण्याशिवाय सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे कामेंग जिल्ह्यातील सेइजोसा आणि आसपासच्या गावांचा राज्याच्या इतर भागांसोबतचा संपर्क तुटला. ऊर्ध्व सुबनसिरी जिल्ह्यातील तालोम रिकताक गावात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. नोआ, दिहिंग आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.(वृत्तसंस्था)
अरुणाचलमध्ये गंभीर पूरस्थिती
By admin | Updated: July 23, 2016 05:38 IST