शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 27 हजारांचा नवा फोन घेतला अन् आठवडाभरात ब्लास्ट झाला; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:48 IST

एका व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला. आठवडाभरानंतर त्या मोबाईलचा स्फोट झाला.

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला. आठवडाभरानंतर त्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तरुण आणि त्याचे कुटुंबीय घाबरले आहेत. तरुणाला आता कंपनीकडून नुकसानभरपाईही हवी आहे. जीव जाण्यासाठी ही महागडी वस्तू खरेदी केली नसल्याचं त्याने म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिवनीच्या गोपाळगंज गावात राहणाऱ्या अखिलेश साहूसोबत ही घटना घडली आहे. काही कामानिमित्त तो सिवनी येथील कान्हीवडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिनोतिया गावात आले होते. तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. बोलत असताना अचानक त्यांच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. सुरुवातीला अखिलेशला काही समजले नाही, पण थोड्या वेळाने त्याच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना दुखापत झाली. अखिलेशसोबत ही घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक मित्र उपस्थित होता. त्याने घाईघाईने अखिलेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तरुणाचा जबाब नोंदवला. या स्फोटाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरूणाने आपला मोबाईल एक आठवड्यापूर्वीच घेतल्याचं सांगितलं आहे. तो कोणाशी तरी बोलत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला.

एका आठवड्यापूर्वी 27 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतल्याचं तरुणाने सांगितलं. नवीन मोबाईलमध्ये धमाका होईल हे माहीत नव्हतं. आता कंपनीने मला भरपाई द्यावी अशी माझी इच्छा आहे. या घटनेनंतर आता हा तरुण मोबाईल वापरायला घाबरत आहे. याबाबत ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलBlastस्फोट