शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्सला हादरे, ८०० अंक उतरला, १३८ अंक चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:25 IST

गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला.

मुंबई : गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल एक्झिट पोलविरुद्ध जात असल्याने, सोमवारी दोन तास शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यानंतर बाजार सावरला. या दरम्यान सेन्सेक्सने एकाच दिवसांत तब्बल १२०० अंकांचा चढ-उतार अनुभवला. गुजरात निकालात सुरुवातीला काँग्रेस-भाजपा यांच्यात काट्याची टक्कर दिसताच, शेअर बाजाराचा निर्देशांक ८१६ अंकांनी गडगडला. दोन तासांनी मात्र, कल पूर्णपणे भाजपाच्या बाजूने दिसले. सकाळी ३३,३६४ वर उघडून ३२,५९५ पर्यंत खाली घसरून सेन्सेक्स ३३,६०१ अंकांवर बंद झाला. या दरम्यान तो ३३,८०१ पर्यंत वर गेला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा १०,१२९ पर्यंत खाली गेलेला निफ्टी निर्देशांकही १०,४४१ पर्यंत वधारून १०,३८९ वर बंद झाला.बाजार विश्लेषक म्हणतात...केंद्र सरकारने उद्योग विश्वासाठी विशिष्ट धोरणे हाती घेतली आहेत. सत्ता परिवर्तन होणे या धोरणांतील अडथळा ठरले असते. त्या भीतीनेच सुरुवातीला बाजारात विक्री दिसून आली. मात्र, सत्ताधारी पक्षाचा विजय होताना दिसताच पुन्हा खरेदीचा जोर वाढला.आर्थिक सुधारणा पुढे नेण्यासाठी जेमतेम दीड वर्षांचा कालावधी असल्याचा इशारा या निकालांनी दिला आहे, असे मत अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अरुण ठुकराल यांनी व्यक्त केले.रुपयातही चढ-उतारसुरुवातीचे निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध जात असल्याच्या भीतीने रुपयादेखील डॉलरसमोर चढ-उतार होताना दिसला. भाजपा मार खात असल्याचा कल आल्याने रुपया ६८ पैशांनी घसरला होता.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Sensexनिर्देशांक