शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेत्यांचे अनुमोदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:34 IST

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते काँग्रेसचे लाडके नेते आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते काँग्रेसचे लाडके नेते आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे, तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग यांनी राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना, ते देशाचे भावी पंतप्रधान आहेत, असे म्हटले आहे.अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मनमोहन सिंग म्हणाले की, सोनिया गांधी यांनी १९ वर्षे देशाची सेवा केली आहे. राहुल गांधी पक्षाच्या महान परंपरा पुढे चालवतील याची खात्री आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य केवळ राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून हे स्पष्ट दिसते की, राहुल गांधी पक्षाध्यक्ष होत असल्याने ते घाबरलेले आहेत.‘औरंगजेबी राज’धरमपूर (गुजरात) : राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर टीका करताना हे तर ‘औरंगजेबी राज’ असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष दिवाळखोर झाला आहे. जी व्यक्ती सध्या जामिनावर आहे, तिला काँग्रेस अध्यक्ष करीत आहे. एका परिवाराचे राजकारण स्वीकारायचे का, हा काँग्रेसचा निर्णय आहे. मात्र आम्हाला हे औरंगजेब शासन नकोय.

काँग्रेसचे ‘पिढीकरण’ पूर्णराहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होत असताना भाजपाचे प्रवक्तेजी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी यानिमित्ताने काँग्रेसचे ‘पिढीकरण’ पूर्ण होत असल्याची टीका केली आहे. भाजपाने यासाठी आज ‘पिढी’ आणि ‘पेडी’ असे शब्द वापरले. पेडी हे राहुल गांधी यांच्या पाळीव कुत्र्याचे नाव आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017