शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, आता विमानाने करता येणार मोफत प्रवास; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:22 IST

रेल्वेने दिलेल्या सवलतीनंतर आता मध्य प्रदेशात विमानात मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens News) विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. सरकारकडून रेल्वे आणि बँकांपर्यंत अनेक कामांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगत आहोत, ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिक मोफत विमानाने प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेने दिलेल्या सवलतीनंतर आता मध्य प्रदेशात विमानात मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे.

राज्य सरकारने ही सुविधा सुरू केलीकेंद्रासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली असून त्यामध्ये त्यांना विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणायासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

सरकारी खर्चाने करता येईल प्रवास या तीर्थ दर्शन योजनेत अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकतात.

राज्य सरकार करते आहे अपग्रेडयाचबरोबर, मुख्यमंत्री म्हणाले की, भिंडमध्ये सध्या नगरपरिषद आहे. राज्य सरकार नगरपालिका म्हणून अपग्रेड करण्याचे काम करत आहे. यासोबतच शहराला वैद्यकीय महाविद्यालयही मिळणार आहे. तसेच, 'विकास यात्रा' राज्यातील सर्व वाड्या आणि गावांना भेट देऊन पात्र लोकांना शासकीय योजनांचा लाभ देईल. याशिवाय, विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान