शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर. वेंकटरामानी होणार देशाचे नवे अ‍ॅटर्नी जनरल, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 23:08 IST

R Venkataramani : अ‍ॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात.

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आर. वेंकटरामानी (R Venkataramani) यांची भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर तीन वर्षे राहतील.

सध्याचे अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यांची जागी आता आर वेंकटरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केके वेणुगोपाल (91 वर्षे) यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार होता. मात्र, केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे अ‍ॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही.

दरम्यान, कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्विट करून आर. वेंकटरामानी यांच्या नियुक्तीची पुष्टी केली. किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाच्यावतीने आर. वेंकटरामानी यांना 1 ऑक्टोबर 2022 पासून भारताचे अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, अ‍ॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करतात. काहीवेळा राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक मुद्द्यावर अ‍ॅटर्नी जनरलचा सल्ला घेतात. 

आर. वेंकटरामानी यांच्याविषयी...13 एप्रिल 1950 रोजी पाँडिचेरी (आता पुडुचेरी) येथे जन्मलेले आर. वेंकटरामाणी हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे सदस्य आहेत. तीन दशकांहून अधिक काळ ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रतिनिधित्व केले आहे. 

आर. वेंकटरामानी यांनी जुलै 1977 मध्ये बार कौन्सिल ऑफ तामिळनाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, 1979 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. 2010 मध्ये त्यांची विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांना कायदा आयोगाचे सदस्य म्हणून आणखी एक टर्म मिळाली होती.

टॅग्स :advocateवकिल