शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन चिघळल्यास सुरक्षा धोक्यात; विघातक प्रवृत्ती घेतील गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 07:59 IST

तातडीने तोडगा काढण्याची मागणी

शीलेश शर्मानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन योग्य तोडगा काढून लवकर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तसे न होता हे आंदोलन आणखी चिघळल्यास त्याचा विघातक प्रवृत्ती गैरफायदा घेण्याची व त्यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाकडे खलिस्तानवादी प्रवृत्ती बारीक लक्ष ठेवून आहेत. हे आंदोलन अधिक चिघळले तर खलिस्तानवादी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बहुतांश पंजाबमधील शेतकरी आहेत. योग्य तोडगा काढून हे आंदोलन लवकरात लवकर न थांबविल्यास त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे कळते.

आंदोलकांवर ड्रोनद्वारे बारीक नजर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबची आर्थिक घडी विस्कटली आहे, असा दावाही त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडा, ब्रिटनमधून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार अधिक सतर्क झाले आहे. शेतकरी आंदोलकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच आंदोलनाची बारीकसारीक माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अतिशय सक्रिय झाल्या आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार