शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:07 IST

Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

श्रीनगर : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यातील एक दहशतवादी जखमी असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.लेलहार गावामध्ये दहशतवादी असल्याची खबर  मिळताच, लष्कर व पोलिसांनी शुक्रवारी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये एक दहशतवादी जखमी झाला. चकमकीनंतर काही वेळाने दोन्ही दहशतवादी सुरक्षा जवानांना शरण आले. त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफली व दारूगोळा जप्त केला आहे. जखमी झालेल्या दहशतवाद्याला प्रथम पुलवामा येथे रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्याला श्रीनगर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.काश्मीरमधील त्राल भागामध्ये मांडुरा परिसरात गुरुवारी रात्री सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. तेही हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी असल्याचे काश्मीर पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था) पाकिस्तानकडून सीमेनजीक गोळीबारपाकिस्तानी सैन्याने काश्मिरात कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेनजीक गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा गोळीबार सुरू झाला. बीएसएफने याला चोख प्रत्युत्तर दिले. रात्री तीन वाजेपर्यंत दोन्हीकडून गोळीबार सुरूहोता. 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान