शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीविना परतले दुसर्‍यांदा पथक भूसंपादनाचा तिढा कायम: राष्ट्रीय महामार्गासाठी आज पुन्हा होणार मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील शेत जमिनीच्या मोजणीसाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे पथक दुसर्‍यांदा मोजणी न करता परत आले. जळगाव शहरच्या नावाने उतार्‍यावर नाव लावण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील शेत जमिनीच्या मोजणीसाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे पथक दुसर्‍यांदा मोजणी न करता परत आले. जळगाव शहरच्या नावाने उतार्‍यावर नाव लावण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली होती. जळगाव शहराची हद्द असताना जळगाव बुद्रुकच्या नावाने मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेत मोजणीस नकार दिला होता. त्यानुसार २२ रोजी मोजणी करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी ममुराबाद शिवारात दाखल झाले. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीची मोजणी होणार आहे, त्या शेतकर्‍यांनी जळगाव शहर या नावाने जिल्हा प्रशासनाने मोजणी करावी तसेच मोजणी करतेवेळी नकाशे हे जळगाव शहराच्या नावाने असावे अशी मागणी केली. प्रशासन जो पर्यंत शेतकर्‍यांच्या या दोन अटी मान्य करीत नाही तोपर्यंत जमिनीची मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. यावेळी पथकाने या मार्गावरून वहिवाट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मार्गाची वहिवाट देखील सापडली नाही. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पथक थांबून होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अधिकारी मोजणीसाठी जाणार आहेत.
दरम्यान, प्रातांधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी काही शेतकर्‍यांशी संपर्क साधला. शेतकर्‍यांनी मोजणी करू न दिल्यास आम्ही शेतकरी सहकार्य करीत नसल्याचा शेरा मारून मोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी होणार्‍या मोजणीकडे लक्ष लागून आहे.