शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत प्रक्रिया प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:51 IST

निवडणूक आयोगाने राबविलेली एसआयआर मोहीम ही मोठी फसवणूक असल्याचा विरोधकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मतदारयाद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला (एसआयआर) नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवात झाली. त्यात अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने राबविलेली एसआयआर मोहीम ही मोठी फसवणूक आहे, अशी टीका तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली. तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक व  मित्रपक्षांनीही ‘एसआयआर’ला विरोध दर्शविला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, बूथस्तरीय अधिकारी मतदारांचे अर्धवट भरलेले गणना फॉर्म वितरित करतील. एसआयआरची प्रक्रिया ४ डिसेंबरपर्यंत चालेल. ९ डिसेंबरला मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम यादी प्रकाशित होईल.

पश्चिम बंगाल, तामिळनाडूत राजकीय वातावरण तापले

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारपासून एसआयआर सुरू होताच तेथील राजकीय वातावरण तापले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहण्यासाठी एसआयआर आवश्यक आहे, असे भाजपचे मत आहे; तर या मोहिमेच्या उद्देशाबद्दल तृणमूल काँग्रेसने शंका उपस्थित केल्या आहेत.

आयोगावर भाजपचा दबाव असून  मतदार यादीत फेरफार करण्यासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे, असा आरोप तृणमूलने केला.  द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात एसआयआरच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Special Summary Revision (SSR) Begins in 12 States, UTs

Web Summary : The Special Summary Revision (SSR) of voter lists has commenced in twelve states and union territories. Political tensions rise in West Bengal and Tamil Nadu amid opposition concerns about the revision's transparency and potential manipulation before the 2026 final list.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारwest bengalपश्चिम बंगालVotingमतदानElectionनिवडणूक 2024