शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल मक्तेदाराला दुसरी नोटीस शेवटची संधी : काम सुरू करण्यास टाळाटाळ; कारवाईचा इशारा

By admin | Updated: April 19, 2016 23:21 IST

जळगाव : केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेले घरकुलांचे काम मक्तेदाराने अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. वाढीव दर मंजूर झालेले असताना व मनपाने आधीचे देणे दिलेले असतानाही मक्तेदाराकडून काम सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्याने बांधकाम विभागाने मक्तेदाराला शेवटची संधी म्हणून दुसरी नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.

जळगाव : केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेले घरकुलांचे काम मक्तेदाराने अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. वाढीव दर मंजूर झालेले असताना व मनपाने आधीचे देणे दिलेले असतानाही मक्तेदाराकडून काम सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्याने बांधकाम विभागाने मक्तेदाराला शेवटची संधी म्हणून दुसरी नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.
केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत मनपातर्फे घरकूल योजना राबविण्यात येत आहे. यासाठी औरंगाबाद येथील मक्तेदारास मक्ता देण्यात आला आहे. मक्तेदाराने ४७२ घरकुलांची योजना असताना त्यापैकी २६० घरकुलांचे काम जवळपास पूर्ण केले आहे. मात्र उर्वरित घरकुलांसाठी तीन इमारतींचे काम अद्यापही सुरू केलेले नाही. शासनाने हे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे तत्पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
उर्वरित २१२ घरकुलांसाठी ३ इमारतींचे काम बाकी आहे. मक्तेदाराने प्रतिघरकूल २ लाख रुपये वाढवून मागितल्याने सुधारित डीपीआर केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाल्यावर तसेच आधीची थकबाकी मिळाल्यावर काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार झालेल्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच सुधारित डीपीआरही मंजूर झाला आहे. केवळ त्याचे लेखी आदेश येणे बाकी आहेत. मक्तेदाराने मनपाला मुदतीत काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे.
नोटीसला थातूरमातूर उत्तर
मार्च २०१७ पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही मक्तेदार वेगवेगळी कारणे पुढे करून काम सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने मक्ता घेतलेल्या कंपनीच्या मालकाला आयुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. तसेच मक्तेदाराला नोटीसही बजावण्यात आली. मात्र मक्तेदाराने या नोटीसलाही थातूरमातूर उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----------
तर मक्तेदारावर कारवाई
मनपा बांधकाम विभागाने वारंवार सूचना देऊन तसेच एक नोटीस देऊनही मक्तेदाराने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे मक्तेदारास शेवटची संधी म्हणून आणखी एक नोटीस देण्यात येणार असून तरीही काम सुरू न केल्यास मक्तेदारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.