२७ पैकी एकाच ग्रामपंचायतीचे दप्तर जमा
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
* कर्मचार्यांचा मात्र संघर्ष समितीला पाठिंबा
२७ पैकी एकाच ग्रामपंचायतीचे दप्तर जमा
* कर्मचार्यांचा मात्र संघर्ष समितीला पाठिंबाचिकणघर : २७ गावांचा मनपात समावेश होऊन १५ दिवस झाले. मात्र, सागाव-सागर्ली या एका ग्रामपंचायतीव्यतिरिक्त मनपाला कोणत्याच ग्रामपंचायतीचे दप्तर जमा करता आले नाही. २७ पैकी पाच पंचायती समावेशाला अनुकूल असल्या तरी अद्याप त्या चार पंचायतींचे दप्तरही जमा होऊ शकलेले नाही. १५ दिवसांनंतरही मनपा अधिकारी आणि कर्मचारी गावात येऊ शकलेले नाहीत. मग, कारभार कसा करणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.दरम्यान, रविवारी संघर्ष समितीची सभा झाली. त्या वेळी मनपा अधिकार्यांना गावात घुसू द्यायचे नाही, असा निर्धार व्यक्त झाला असून वातावरण चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचबरोबर २७ गावांच्या ४९१ कर्मचार्यांनी मात्र संघर्ष समितीला रविवारी जाहीर पाठिंबा दिला आहे. शासन, मनपा आणि संघर्ष समिती यांच्या वादात ग्रामपंचायतींच्या ४९१ कर्मचार्यांचे जून महिन्याचे वेतन कोण देणार, याची चिंता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर / अरविंद म्हात्रे).........................वाचली- नारायण जाधव