शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

“मूर्ती घडताना पाहायचे होते”; अरुण योगीराज यांच्या आईने सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:29 IST

Ayodhya Ram Mandir News: प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तींची निवड राम मंदिरासाठी करण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir News ( Marathi News ): २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिर उद्घाटनाची बरीचशी कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामलल्लाचा गाभारा सज्ज करण्यात आला आहे. राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तींची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी या मूर्ती साकारल्या आहेत. यानंतर अरुण योगीराज यांच्या आईने प्रतिक्रिया देताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राम मंदिरासाठी मूर्ती निश्चित करण्यात आल्यासंदर्भात माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, ज्याठिकाणी राम आहे त्याठिकाणी हनुमान आहे. अयोध्येत प्रभू राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. राम आणि हनुमानाच्या अतुट नात्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी कर्नाटकातून रामलल्लाची ही महत्त्वाची सेवा आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाणार असल्याचे पुढे आले आहे. या निर्णयानंतर अरुण योगीराज यांच्या आईने प्रतिक्रिया दिली. 

आमच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण आहे

अरुण योगीराज यांच्या आईचे नाव सरस्वती आहे. त्या म्हणाल्या की, आमच्यासाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण आहे, मला ती मूर्ती घडताना पाहायचे होते, पण तो म्हणाला की, मला शेवटच्या दिवशी घेऊन जाईन. आता मी प्रतिष्ठापनाच्या दिवशी जाईन. माझ्या मुलाची प्रगती आणि यश पाहून मला आनंद झाला आहे. माझा मुलगा गेले सहा महिने अयोध्येत आहे, अशी प्रतिक्रिया सरस्वती यांनी दिली.

दरम्यान, अरुण योगीराज हे कर्नाटकच्या म्हैसूर शहरात राहणारे आहेत. ते एका प्रसिद्ध मूर्तीकार कुटुंबातून येतात. त्यांच्या ५ पिढ्या मूर्त्या बनवण्याचे काम करतात. अरुण योगीराज हे देशातील प्रसिद्ध मूर्तीकारांपैकी एक आहेत. देशातील विविध राज्यात अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीला सर्वाधिक मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या मूर्ती बनवण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुण योगीराज यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. २००८ मध्ये कंपनीतून राजीनामा देत त्यांनी पूर्णवेळ मूर्तीकार म्हणून काम केले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर