शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला घराबाहेर पडणंही होतंय लाजिरवाणं; स्कूटीच्या नंबर प्लेटवरील 'ती' तीन अक्षरं ठरतायत कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 09:34 IST

स्कूटीच्या नंबर प्लेटवरून दिल्लीतील एका तरुणीला होतोय मनस्ताप. RTO कडे नंबर बंदलण्याची मागणी. तिला जी स्कूटी मिळाली त्यामध्ये S.E.X हे अल्फाबेट्स होते.

जरा विचार करा, जर तुमच्यासाठी तुमच्या गाडीचा नंबर हा लाजिरवाणी बाब ठरत असेल तर? अगदी अशीच घटना दिल्लीतील एका तरुणीसोबत घडली आहे. दिल्लीतील एका कॉलेज तरुणीला तिच्या वडिलांनी वाढदिवसाच्या दिवशी एक स्कूटर गिफ्ट केली. पण त्या स्कूटरचा जो नंबर आला तो आता त्या मुलीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

दिल्लीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तुरूणीला तिच्या वडिलांनी तिच्या मागणीनुसार एक स्कुटर गिफ्ट केली. तिच्या वडिलांनी साठवलेल्या पैशातून एक स्कूटर  बुकही केली. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. परंतु तिची डोकेदुखील स्कूटर मिळाल्यानंतर तिच्या नंबर प्लेटवरून सुरू झाली. संबंधित तरुणीच्या स्कूटरला आरटीओकडून जो नंबर देण्यात आला त्यात नंबरच्या सीरिज ही S.E.X या अक्षरांपासून सुरू होणारी होती.

संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जराही कल्पना नव्हती की केवळ एक नंबर प्लेट त्यांची डोकेदुखी वाढवू शकते. गाडीच्या नंबरमध्ये असणारे S.E.X ही अक्षरं अनेकांना विचित्र वाटू लागली. याशिवाय अनेकांनी रस्त्यातही संबंधित तरुणीच्या भावालाही सतावण्यास सुरूवात केली. तरुणीच्या भावानं घरी येऊन हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर तरुणीच्या मनात भीती निर्माण झाली. तसंच तिनं आपल्या गाडीचा नंबर बदलण्याची मागणीही केली. 

दिल्ली आरटीओच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० हजार गाड्यांसाठी या सीरिजचे नंबर अलॉट करण्यात आले आहेत. परंतु लोकांच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी संबंधित तरुणीनं घराबेहर पडणंही बंद केलं. दरम्यान, तिनं ही नंबर प्लेट बदलण्याची मागणी केली असून हे खरंच शक्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा गाडीला नंबर अलॉट झाल्यानंतर तो बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. ही प्रक्रिया एका सेट पॅटर्ननुसार चालते, अशी प्रतिक्रिया कमिश्नर ऑफ दिल्ली ट्रान्सपोर्ट के.के.दहिया यांनी दिली.

टॅग्स :delhiदिल्लीRto officeआरटीओ ऑफीस