शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

CoronaVirus News: ...तर देशात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती; शास्त्रज्ञ चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 19:45 IST

CoronaVirus News: देशातील शास्त्रज्ञांचं पंतप्रधान मोदींना पत्र; प्लाझ्मा थेरेपीच्या वापराबद्दल चिंता व्यक्त

- सचिन कोरडेभारताच्या काही डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना नुकतेच एक पत्र लिहिले आहे. कोविड १९ बाधित रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्लाझा थेरपीचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासानंतर समोर येत असून प्लाझ्मा थेरपीच्या अतार्किक वापरामुळे अधिक घातक स्ट्रेन निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. असे झाले तर महामारीत अधिक भर पडेल.प्लाझ्मा थेरपीच्या आग्रहामुळे कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रूग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना नैतिक दबाव आणि त्रासाचा सामना करावा लागतो, हे टाळता येईल. त्यामुळे तातडीची बाब म्हणून यात लक्ष घालून आयसीएमआर आणि एम्स यांनी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा पूर्णविचार करून त्यात संशोधन आधारित नवी मार्गदर्शक तत्वे द्यावीत, अशी विनंती केली आहे.

धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसारप्लाझा थेरपीच्या आग्रहामुळे त्यात काळा बाजार होत असल्याचे देखील समोर आले आहे. काही ठिकाणी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा मिळवून देण्याचा भरभक्कम मोबदला मागितला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच काही रक्तपेढ्यांकडून बदली दाता देण्याची अट ठेवली जाते आहे.मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कारप्लाझ्मा दानासाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे. अनेक स्वयंसेवक स्वतःहून पुढाकार घेऊन या चळवळीत योगदान देत आहेत. बरे झालेले कोविड रुग्ण शोधून यादी तयार करणे, गरजू रुग्णांची साचेबद्ध माहिती भरून घेणे, त्यांचा समन्वय साधून देणे अतिशय उदात्त हेतूने केले जात आहे. यामागे व्यापक सामाजिक हित आणि महामारीविरुद्ध लढण्याची प्रबळ प्रेरणा असली तरी यांच्यापर्यंत त्याची वैज्ञानिक तथ्य पोहोचली पाहिजे. त्यासाठी डाॅक्टरांकडूनही प्रयत्न केले जात आहेत.यासंदर्भात, झारखंड येथे सेवा देत असलेले कुटूंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य अभ्यासक डॉ. सचिन बारब्दे म्हणाले की, प्लाझ्मा दान करण्याची पद्धत ही १९२० च्या जवळपास सुरु झाली होती. त्यावेळी युद्धात असलेल्या सैनिकांना प्लाझ्मा दिला जायचा. सैनिकाच्या शरिरात एँटीबॉडीज तयार झाल्याने त्यांचे प्राण वाचायचे. मात्र कोरोना हा व्हायरस असल्यामुळे तो शरिररात मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतो. त्यामुळे प्लाझ्माचा त्याला इतका फायदा होत नाही, हे शास्त्रज्ञांनाही कळून आले आहे. नागपूर येथे जी प्लाझ्मा ट्रायल झाली होती. त्यातूनही हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्लाझ्मा दानापेक्षा रक्तदान करावे, असे मला वाटते. कारण देशात रक्ताची कमतरता आहे. यावर केंद्र सरकारही विचार करेल, अशी अपेक्षा आहे. सरकारने कोविडला हरवण्यासाठी केवळ लसीकरणावर भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी