शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान भवनात शक्तिप्रदर्शन !

By admin | Updated: December 4, 2015 01:03 IST

दिल्लीच्या विज्ञान भवन येथे १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७५वा वाढदिवस हा एकप्रकारे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या विज्ञान भवन येथे १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७५वा वाढदिवस हा एकप्रकारे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला देशभरातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हीव्हीआयपींची यादी प्रचंड मोठी असल्याकारणाने या सर्वांना विज्ञान भवनातील व्यासपीठावर कसे सामावून घ्यायचे, हा आयोजकांपुढचा यक्षप्रश्न आहे.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किमान डझनभर मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तथापि आयोजकांना सोनिया गांधी यांच्याकडून अद्याप होकार मिळालेला नाही. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि एच. डी. देवेगौडा हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, राज्यसभेचे नेते अरुण जेटली आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विज्ञान भवनच्या व्यासपीठावर फक्त १३ लोकांना सामावून घेता येते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्व व्हीव्हीआयपींना एका व्यासपीठावर कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न आयोजकांसमोर आहे. प्रकाशसिंग बादल हे देशातील सर्वांत ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत आणि ते आले तर त्यांना व्यासपीठावर स्थान द्यावेच लागेल. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत.राष्ट्रपतिपदाची निवडणूक जुलै २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असल्याने महत्त्वाकांक्षी पवार यांनी रायसिना हिल्सवर डोळा ठेवून हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित तर केला नाही ना, असा प्रश्न सत्तेच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे. पवारांचा हा ७५ वा वाढदिवस देशभरात साजरा करण्याची योजना असून हा मोठ्या राजकीय डावपेचाचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. शिवाय विज्ञान भवनमधील हे शक्तिप्रदर्शन एक राजकीय संकेतही ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर नजर?राष्ट्रपतिपदाची निवडणूक जुलै २०१७ मध्ये होणार आहे. या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असल्याने महत्त्वाकांक्षी पवार यांनी रायसिना हिल्सवर डोळा ठेवून हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित तर केला नाही ना, असा प्रश्न सत्तेच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.