शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नोएडा व गाझियाबादमध्ये शाळा बंद; एकाच शाळेतील १० विद्यार्थी झाले विषाणूबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 09:10 IST

नोएडा व गाझियाबादमध्ये १० विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

नवी दिल्ली :

नोएडा व गाझियाबादमध्ये १० विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर दिल्ली व एनसीआरमध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. सर्व शाळांचे वर्गही सुरू झाले आहेत. परंतु, गाजियाबाद व नोएडातील शाळेत १२ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच शाळेतील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे प्रशासनाने नोएडा व गाझियाबाद शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गाझियाबादचे जिल्हा निगराणी अधिकारी डॉ. राकेश गुप्ता यांनी म्हटले.

 देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १,०८८ रुग्ण आढळले तर २६ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंत एकट्या केरळमधील १९ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून १०,८७० झाली आहे तर कोरोनामुळे देेशात मरण पावलेल्यांची एकूण संख्या ५,२१,७३६ झाली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत लसीच्या १८६.०७ कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.

पालकांनी घाबरू  नये - केजरीवालनोएडा व गाझियाबाद येथे कोरोनाग्रस्त विद्यार्थी आढळून आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीतील पालकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांची पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शांघायमधील भारताची वकिलात सध्या बंद चीनचे व्यावसायिक शहर शांघायमध्ये कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्यामुळे येथील भारतीय वकिलातीने व्यक्तिश: भेटीची सेवा बंद केली आहे. शांघायमध्ये २६ दशलक्ष लोक राहतात. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे चीनच्या कोरोना महामारीला रोखण्यासाठीच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्व चीनमधील प्रांतात राहत असलेले भारतीय नागरिक बीजिंगमधील भारतीय दूतावासातील सेवा घेऊ शकतील, असे दूतावासाने सूचनेत म्हटले आहे.

निर्बंध हटताच हरियाणातही रुग्ण वाढले1. दिल्लीजवळ असलेल्या हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक महिन्यानंतर कोरोनाचे नवे १२९ रुग्ण आढळले. मास्क वापरण्याचे बंधन राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर हे रुग्ण वाढले.2. दिल्ली सरकारने मास्क न वापरल्यास दंड न आकारण्याचे ठरवल्यावर तेथेही रुग्णांची संख्या वाढली. 3. ४ मार्च रोजी गुरुग्राममध्ये कोरोनाचे नवे ११५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ते १०० च्या खाली आले होते. हरियाणा सरकारने १६ फेब्रुवारी रोजी कोविडशी संबंधित सगळे निर्बंध मागे घेतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या