शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ८ वी पास व्यक्तीकडून रेझर ब्लेडनं सीझरचा प्रयत्न; महिलेसह बाळ दगावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:00 IST

सीझर करणाऱ्या व्यक्तीला आणि रुग्णालयाच्या मालकाला पोलिसांकडून अटक

लखनऊ: शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या व्यक्तीनं एका महिलेची प्रसुती केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. व्यक्तीनं रेझर ब्लेडच्या सहाय्यानं महिलेचं सीझर करण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू झाला. प्रशासनाकडे नोंद नसलेल्या एका रुग्णालयात ही घटना घडली.सुलतानपूरमधल्या सैनी गावात बुधवारी रात्री ३० वर्षीय व्यक्तीनं महिलेची प्रसुती केली. राजेंद्र शुक्ला असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे. शुक्ला सैना गावातल्या माँ शारदा रुग्णालयात काम करतो. हे रुग्णालय राजेश सहानी नावाच्या मालकीचं आहे. त्यांनी शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी राजेंद्र शुक्लाकडे सोपवली होती.महिला आणि बाळ दगावल्यानंतर तिच्या पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर शुक्ला आणि सहानी यांना अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे केवळ काही सुईणांच्या मदतीनं सहानी संपूर्ण रुग्णालय चालवत होता. या रुग्णालयात राजाराम नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी पूनमला प्रसुतीसाठी दाखल केलं होतं. मात्र प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला आणि बाळदेखील दगावलं. यानंतर राजारामनं पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर माँ शारदा रुग्णालयात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला.राजेश सहानी प्रशासनाकडे कोणतीही नोंदणी करता, परवानगी न घेता रुग्णालय चालवत असल्याची माहिती तपासातून पुढे आल्याचं सुलतानपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदींनी सांगितलं. या रुग्णालयात रेझर ब्लेडच्या मदतीनं प्रसुती केली जात होती. अनेक अत्यावश्यक सुविधांचा रुग्णालयात अभाव होता. तपासादरम्यान आम्हाला मोठा हलगर्जीपणा दिसून आला, अशी माहिती चतुर्वेदींनी दिली.