शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली (पान १)

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली
आता ५ वी आणि ८वीला परीक्षा : शिक्षण हक्क कायद्यामुळे बदल
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीआय) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्तेत बदल करण्यात आला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता ४थी ऐवजी ५ वी तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी ऐवजी ८ वी मध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शालांतस्तरावरील गट बदलण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार आता इ. १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक, इयत्ता ६ वी ते ८वीपर्यंत उच्च प्राथमिक, तर इयत्ता ९ वी ते १० वी माध्यमिक अशी तीन गटात शालांत शिक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. या बदलामुळे शालेयस्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेतही बदल करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला असून यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच या परीक्षा पध्दतीत व अभ्यासक्रमात काही बदल होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार परीक्षाविषयक मार्गदर्शन या डिसेंबर २०१५ पयंर्त करण्यात येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
-----
या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी इ. ४ थी आणि इ. ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल, असे तावडे यांनी केंद्र सरकारला सुचविले आहे.