शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पोलीस मालखान्यात ५९ लाखांचा घोटाळा, हेड कॉन्स्टेबलचा जामीन फेटाळला

By admin | Updated: January 8, 2016 02:13 IST

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील ५८ लाख ८० हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने मालखानाप्रमुख हेड कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील ५८ लाख ८० हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने मालखानाप्रमुख हेड कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दिलीप सुदाम चौरपगार,असे आरोपी हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो २००४ पासून ८ डिसेंबर २०१५ या काळात अंबाझरी पोलीस ठाण्यात मालखान्याचा प्रमुख होता. सट्ट्याच्या आहारी जाऊन त्याने विविध गुन्ह्यात जप्त मालखान्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा अपहार केला. अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बाबूराव खाडे यांच्या तक्रारीवरून चौरपगारविरुद्ध ८ डिसेंबर २०१५ रोजी भादंविच्या ४०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी त्याला अटकही करण्यात आली होती.
मालखान्यातील सोन्याचे दागिने त्याने विविध सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवून त्याने या संपूर्ण पैशांची उधळपट्टी केली होती. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश गोराडे यांनी तपास करून सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण असलेले दागिने जप्त केले होते. आतापर्यंत एकूण ७ लाख २६ हजार ८१७ रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. सध्या चौरपगार हा पोलीस खात्यातून निलंबित असून कारागृहात बंदिस्त आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.
वासनकरचे १४ लाख व एक किलो सोने हडपले
शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधीने लुबाडणाऱ्या प्रशांत वासनकर आणि इतरांविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात ९ मे २०१४ रोजी भादंविच्या ४२०, ४०६, ४०९, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २७ जुलै २०१४ रोजी आर्थिक गुन्हे पथकाकडून प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजीत चौधरी यांना अटक करण्यात आली होती. वासनकरकडून १४ लाख रुपये आणि ९३६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. रोख रक्कम बँकेत जमा करण्यात आली होती. रक्कम काढण्याचे आणि ठेवण्याचे अधिकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि चौरपगार या दोघांनाच होते. चौरपगार याने गैरफायदा घेत संपूर्ण १४ लाखांची रोख काढून घेऊन हडपली होती. पुढे बिंग फुटताच त्याने स्वत:चे भूखंड विकून पुन्हा ही रक्कम बँकेत जमा केली होती. मात्र संपूर्ण दागिने त्याने हडपले आहेत.