शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एससी-एसटी(अॅट्रॉसिटी)अंतर्गत सरकारी अधिका-यांना आता तात्काळ अटक होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:07 IST

सर्वोच्च न्यायालयानं एससी आणि एसटी कायद्यांत मोठे बदल केले आहे. एससी/एसटी अॅक्टअंतर्गत प्रकरणातील तात्काळ अटक करण्यावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे.

नवी दिल्ली- सरकारी अधिका-यांविरोधात एससी/एसटी(अॅट्रॉसिटी)अंतर्गत आता तात्काळ गुन्हा दाखल करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली आहे. एससी/एसटी(अॅट्रॉसिटी)अंतर्गत कोणत्याही अधिका-याविरोधात गुन्हा दाखल करण्याआधी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याकडून प्राथमिक चौकशी करणं आवश्यक आहे. न्यायमूर्ती आदर्श गोयल आणि न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झालीय. चौकशीनंतर त्या संबंधित अधिका-याला अटक करता येणार आहे. तसेच न्यायालयानं अटकपूर्व जामीनअर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आता तुम्हाला जामीन मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली होती. अॅट्रॉसिटीच्या संबंधातून पोलिसांनी शेकडो मुलांना घराबाहेर काढून मारलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास तो रद्द करून त्याऐवजी दुसरा कायदा आणावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. शिवाय, “अॅट्रॉसिटीविषयी सर्वप्रथम मी बोललो. त्यानंतर शरद पवार बोलले. पण टीका माझ्यावरच झाली”, असेही राज म्हणाले होते.

मूळ प्रवाहातील बहिष्कृत समाजाला न्याय मिळावा, यासाठी अॅट्रॉसिटी हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे अत्याचार कमी झाल्याचा दावा समाजसुधारकांनी केला आहे. या कायद्याचा गैरवापर करण्यात आल्याचे अनेक प्रकारही समोर आले होते. एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास देण्यासाठी या कायद्यांतर्गत खोटे गुन्हा दाखल केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या.