शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CAAवर तात्काळ प्रतिबंध घालण्यास SCचा नकार, केंद्राला पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 12:21 IST

Citizen Amendment Act : सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. 

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्या(सीएए)संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 144 याचिका दाखल करण्यात आल्या असून, सर्वोच्च न्यायालयानं आज त्याच्यावर सुनावणी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. सीएएसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या 144  याचिकांवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधित 144 याचिकांवर सुनावणी घेतली. सीएएच्या घटनात्मक वैधतेला इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग, पीस पार्टी, आसाम गण परिषद, ऑल असम स्टुडंट्स युनियन, जमायत उलेमा ए हिंद, जयराम रमेश, महुआ मोइत्रा, देव मुखर्जी, असदुद्दीन ओवैसी, तहसीन पूनावाला आणि केरळ सरकारसह इतरांनी आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं सर्वच प्रकरणात केंद्र सरकारला नोटीस पाठवली असून, चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं कायद्यासंदर्भात कोणताही अंतरिम आदेश जारी केलेला नाही.केंद्राची बाजू ऐकून घेतल्याशिवाय नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती देता येणार नाही. आम्ही कोणताही आदेश जारी करू शकत नाही, असंही सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात आता कोणतीही नवी याचिका दाखल करू नका, असा आदेश न्यायालयानं काढण्याची मागणी अॅटर्नी जनरलनं केली आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार