शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

SBI ने सरकारचे कान टोचले; 'इंधन स्वस्ताईसाठी इच्छाशक्तीची गरज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 14:42 IST

कोरोना व्हायरस आणि रशियामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने नुकतेच  उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढविले होते.कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे पुरवठा प्रभावित होणार आहे.

एसबीआय इकोरॅपने मंगळवारी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. कोरोना व्हायरस आणि रशियामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेले आहेत. यामुळे भारतात पेट्रोलडिझेलचे दर १२ आणि १० रुपयांनी कमी करता येऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मनात आणले पाहिजे, असेही यामध्ये म्हटले आहे.

जर केंद्र आणि राज्य सरकारांना इंधनाच्या दरात कपात करायची नसेल तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उत्पादन शुल्कात वाढ करू नये. असे केल्याने सामान्य लोकांना किंमती कमी झाल्याचा लाभ मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती जवळपास ३० डॉलरच्या आसपास आल्या आहेत. जर उत्पादन शुल्क वाढविले नाही, तर त्याचा लाभ लोकांना हेईल असा दावा एसबीआय इकोरॅपने केला आहे.

केंद्र सरकारने नुकतेच  उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढविले होते. यामुळे मिळणारे उत्पन्न सरकारने खालच्या स्तरावरील लोकांसाठी खर्च करायला हवे. कारण कोरोनामुळे व्यवसाय, व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे त्यांच्या समोर रोजगाराचा आणि उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

एसबीआय समुहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रयत्नांसोबत सरकारने ग्राहकांची मागणी वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच या कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत निधीची घोषणा करायला हवी.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे पुरवठा प्रभावित होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसोबत औषधांच्या क्षेत्राशी संबंधीत निर्यातीवर परिणाम होणार आहे. आता पर्यटन, प्रवास, खरेदी यासारख्या धंद्यांवर परिणाम जाणवू लागला आहे. आरबीआयने जर दरांमध्ये कपात करण्यापेक्षा जास्तीतजास्त रणनिती ठरविण्यावर भर दिला पाहिजे. जर आरबीआय मोठ्या प्रमाणावर रेपोरेट घटवत असेल तर त्याचा परिणामही जाणवणार असल्याचे घोष यांनी सांगितले. कारण भारतीय बाजारात गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग होणार आहे.

टॅग्स :SBIएसबीआयPetrolपेट्रोलDieselडिझेलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक