राहुल गांधींची वरिष्ठ नेत्यांना विचारणा : मोदींना टक्कर देण्यासाठी आक्रमक बनण्याचा सल्ला
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
निवडणुकीतील सततच्या पराभवाने त्रस्त झालेल्या काँग्रेसला आता पक्ष संघटन बळकट करण्याची चिंता सतावत आहे. परिणामी, पक्ष संघटन बळकट कसे करता येईल, असा प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारत आहेत. मागील एक आठवडय़ापासून राहुल गांधी वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून पक्ष संघटना बळकट बनविण्याबाबत त्यांचे मत जाणून घेत आहेत.
जोर्पयत बंद खोलीत बसणा:या नेत्यांना बाजूला सारले जात नाही तोर्पयत मोदींशी मुकाबला केला जाऊ शकत नाही. कारण मोदी खोटे बोलण्यात आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये निपुण आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला अधिक आक्रमक बनून रस्त्यावर यावे लागेल, असे पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना स्पष्टपणो सांगितल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रंनी दिली.
पक्ष संघटनेच्या प्रत्येक स्तरावर निवडणुका घेण्याची राहुल गांधी यांची योजना आहे. परंतु पक्षाच्या एका सरचिटणीसाने त्यांची ही योजनाच खारीज केल्याचे समजते. या सरचिटणीसाने कार्य समितीच्या निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले आणि समितीचे सदस्य पक्षाध्यक्षांनीच नामनियुक्त करण्याची वकिली केल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांनी आतार्पयत ज्या नेत्यांसोबत पक्ष बळकटीबाबत विचारविमर्श केलेला आहे, त्यात अहमद पटेल, सुशीलकुमार शिंदे, जनार्दन द्विवेदी, मणिशंकर अय्यर, सचिन पायलट, गिरिजा व्यास, अंबिका सोनी, मीनाक्षी नटराजन, अजय माकन, जे.डी. सीलम, मुकुल वासनिक, अमरिंदर सिंग, जयपाल रेड्डी आदींचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी स्वत: पक्षनेत्यांची यादी तयार केली आहे आणि ते प्रत्येकाला स्वत: फोन करून भेटण्यास सांगत आहेत. कालपरवार्पयत जे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करीत होते, त्याच नेत्यांना राहुल गांधी आता स्वत: चर्चेसाठी बोलावून घेत आहेत.
च्पक्षाच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी युवा टीमला सोबत घेऊन पक्ष चालविण्याचा विचारही तूर्तास बाजूला सारला आहे आणि आता ते पक्षाच्या ज्येष्ठ व जुन्याजाणत्या नेत्यांना सोबत घेऊन चालण्याच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांनी या नेत्यांशी चर्चा केली त्यावेळी पक्षांतर्गत लाथाळ्याचा मुद्दाही उपस्थित केला गेला.
च्पक्षाचे नेते 24, अकबर मार्ग येथे बसून आपसातच राजकारण खेळतात, त्यामुळे पक्ष सर्व स्तरावर प्रभावित होत आहे, अशी तक्रार काही नेत्यांनी केली. पक्ष संघटनेत तत्काळ मोठा फेरबदल करण्याची मागणी काही नेत्यांनी या चर्चेदरम्यान केली. राहुल गांधी यांच्याशी सुरू असलेल्या या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये व्यापक फेरबदल होण्याची शक्यता आहे.