सावरगाव....
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
सावरगाव
सावरगाव....
सावरगावस्थानिक गांधी चौक येथे सरपंच उमेश सावंत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी सभापती सतीश शिंदे, जि. प. सदस्य केशव कुंभरे, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रसंगी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. संताजी सोसायटी कार्यालयात जयंत दाढे, कृउबास समिती कार्यालयात मुशीर शेख, राणीलक्ष्मी महाविद्यालयात अमरसिंग पल्हेरिया, कन्या विद्यालयात ज्ञानेश्वर बालपांडे, गायत्री मंदिर परिसरात सदीप बालपांडे यांनी ध्वजारोहण केले. तसेच नाडेकर विद्यालय, उच्च प्राथमिक शाळा क्र. १ व २, संत जगनाडे वाचनालय, एकलव्य विद्यानिकेतन, राऊत विद्यालय, संत गजानन विद्यालय सिंदी आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.