शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मक्केतील ‘उमरा’ यात्रेसाठी जगभरातील नागरिकांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:42 IST

अनिश्चित काळापर्यंत व्हिसा रद्द; कोरोना विषाणूमुळे सौदी सरकारचा निर्णय

- जमीर काझी मुंबई : चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका आता भारतातून मक्का, मदिना येथे धार्मिक यात्रेसाठी (उमरा) जाणाऱ्या मुस्लिमांना बसला आहे. सौदी अरेबिया सरकारने गुरुवारी भारतासह आशिया खंडातील देशांतील नागरिकांना अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी घातली आहे. त्यासाठी सौदी दुतावासाकडून जारी केलेले ‘उमरा आणि पर्यटनासाठी व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहेत.मक्का आणि मदिना शहरातील हज यात्रेचा मुख्य विधी यावर्षी आॅगस्टच्या मध्यावर आहे. तोपर्यंत कोरोनाचा (कोविड - १९) प्रादुर्भावावर प्रतिबंध न बसल्यास भारतीयांच्या हज यात्रेवरही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. ‘उमरा’चा विधी वर्षातील साधारण दहा महिने सुरु असतो. त्यासाठी भारतातून दररोज जवळपास २०० भाविक सौदी अरेबियाला प्रस्थान करतात. याशिवाय हज यात्रेसाठी हज कमिटी व खासगी टूर्स कंपनीकडून सुमारे पावणे दोन लाखांहून अधिक भाविक जातात. कोरोनावर नियंत्रण न आल्यास ‘उमरा’बरोबरच हज यात्रेकरूंनाही त्याचा फटका बसेल.चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली. त्यामुळे सौदी सरकारने जगभरातून त्यांच्याकडे येणाºया भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘उमरा’ व पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द केले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असे सौदी सरकारने स्पष्ट केले. भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, जपान, थायलंड, कोरिया, इटली, इराण,येमेन, फिलीपिन्स आदी देशांच्या नागरिकांवरही बंदी घालण्यात आली.भारतातून रोज २०० यात्रेकरूंचा प्रवास‘उमरा‘चा विधीमध्ये रमे जमरात, कुर्बानी हे हज यात्रेतील विधी नसतात. तसेच मीना, अरफात, मुजदलबा येथे वास्तव्य नसते. तवाफ हे विधीही नसतात. ज्यांना हजला जाणे शक्य होत नाही, ते उमरासाठी सोयीनुसार जातात. भारतातून सरासरी २०० जण यात सहभागी होतात. एका यात्रेकरुकडून टूर चालक त्यांच्या सुविधाप्रमाणे सरासरी ६० हजार ते १ लाखांपर्यंत शुल्क घेतात.- हाजी बालेचॉँद भालदार, उपाध्यक्ष, हज फाऊंडेशनहज यात्रेच्या वेळापत्रकात बदल नाहीसौदी सरकारने उमरा व पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द केला असला तरी आॅगस्टमधील हज यात्रेबाबत काही निर्णय घेतला नाही. भारतातून त्याचे नियोजन पूर्वीप्रमाणेच कायम असून त्यामध्ये बदल केलेला नाही.- डॉ. मकसुद खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया

टॅग्स :corona virusकोरोना