शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तासनतास 'मन की बात' करणारे पंतप्रधान मणिपूरवर फक्त ३६ सेकंद बोलले, सत्यपाल मलिकांचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:51 IST

काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक  (Satya Pal Malik) हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर सत्यपाल मलिक हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मन की बातसह इतर मुद्द्यांवर तासनतास बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये घडलेल्या अमानुष आणि लज्जास्पद घटनेबद्दल केवळ ३६ सेकंद बोलले. काही सेकंदांचे त्यांचे विधान सर्वांनाच चकित करणारे आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक यांनी मणिपूर हिंसाचाराबद्दल ट्विट करत म्हटले की, "महिन्याला तासनतास मन की बात बोलणारे पंतप्रधान आज जळत्या मणिपूरवर केवळ ३६ सेकंद बोलले. असे का? बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणाऱ्या सरकारच्या काळात मुलींची खुलेआम धिंड काढली जात आहे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेली घटना निंदनीय आहे."

यापूर्वी २० जुलै रोजी सत्यपाल मलिक यांनी मणिपूर हिंसाचार लाजिरवाणा असल्याचे म्हटले होते. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा असल्याचे ते म्हणाले. मणिपूरच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवले ते आपल्याच देशात गेल्या ६० दिवसांपासून जळत असलेल्या मणिपूरला का वाचवत नाहीत. हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर संपूर्ण देशात अशीच दंगली घडवतील.

काय घडलं मणिपूरमध्ये?मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. या लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले. त्यानंतर २१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.   

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदी