शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शनिवारी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे , नेहरू-गांधी घराण्यातील सहावा पक्षप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:39 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आले.काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जमागे घेण्याचा सोमवार ११ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. या पदासाठी राहुल गांधी हे एकमेव उमेदवार असून, त्यांच्या वतीने दाखल केलेले सर्व ८९ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन व सदस्य मधुसूदन मिस्त्री व भुवनेश्वर कलिता राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करतील, अशी अपेक्षा आहे.रामचंद्रन यांनी सांगितले की, निवडीची घोषणा सोमवारी झाली, तरी अध्यक्षपदी नेमणुकीचे अधिकृत प्रमाणपण राहुल गांधी यांना १६ डिसेंबर रोजी मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिले जाईल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता १३२ वर्षांच्या जुन्या पक्षाची धुरा अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातून आलेल्या पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतील.दोनच दिवसांपूर्वी वयाची ७१ वर्षे पूर्ण केलेल्या सोनिया गांधी यांनी सर्वाधिक काळ म्हणजे १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले. त्यांच्याकडून ती जबाबदारी ४७ वर्षांच्या राहुल गांधींकडे येण्याने पक्षाचे नेतृत्व नव्या पिढीकडे जाईल. राहुल यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीकडे आणि सहाव्या सदस्याकडे जाईल. या घराण्यातील मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे या आधीचे पक्षाध्यक्ष होते.काँग्रेसला सरकारस्वातंत्र्यानंतर ५० वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाची गेल्या काही वर्षांत झपाट्याने होत असलेली घसरण रोखून पक्षाला नवसंजीवनी देण्याचे शिवधनुष्य राहुल गांधी यांना पेलावे लागणार आहे. एके काळी देशाच्या कानाकोपºयात सत्ता असलेल्या काँग्रेसकडे फक्त पाच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसnewsबातम्या