सतीश शेी यांच्या हत्येचा पुन्हा तपास
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
नवी दिल्ली : आरटीआय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश शेी यांच्या हत्याप्रकरणाचा पुन्हा तपास करणाचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर समूहाच्या विविध परिसरांवर घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मिळालेल्या आक्षेपार्ह दस्तऐवजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.
सतीश शेी यांच्या हत्येचा पुन्हा तपास
नवी दिल्ली : आरटीआय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणाचा पुन्हा तपास करणाचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर समूहाच्या विविध परिसरांवर घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मिळालेल्या आक्षेपार्ह दस्तऐवजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. विशेष तपास चमूने आक्षेपार्ह दस्तऐवज मिळविल्याच्या आधारावर उच्चस्तरावर हा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शेट्टी यांनी लोणावळा आणि अन्य रस्ते प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाली होती. ऑगस्ट २०१४ मध्ये सीबीआयने तपास थांबविण्याचा निर्णय घेतला होता. विशेष न्यायालयाने पुन्हा तपासाचा आदेश दिल्यानंतर सीबीआयने यावर्षी जानेवारीमध्ये सदर कंपनीच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यालयांवर छापे मारले होते. या प्रकरणी सदर कंपनीच्या संचालकांची चौकशी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.(विशेष प्रतिनिधी)