शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, कोचीन शिपयार्डमध्ये निघाली भरती    

By ravalnath.patil | Updated: October 8, 2020 12:16 IST

Cochin Shipyard Recruitment 2020 : इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ठळक मुद्देCochin Shipyard मध्ये या भरती अंतर्गत 577 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : देशातील तरुणांना सरकारीनोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. कोचीन शिपयार्डच्या विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ज्यामध्ये शीट मेटल वर्कर, वेल्डर, फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटार वाहन, चित्रकार, इलेक्ट्रीशियन आणि क्रेन ऑपरेटरसह सर्व पदांसाठी भरती असणार आहे. 

यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार cochinshipyard.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2020 आहे.

पदांची नावे व संख्याCochin Shipyard मध्ये या भरती अंतर्गत 577 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये शीट मेटल वर्कर, वेल्डर, फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर वाहन, चित्रकार, इलेक्ट्रीशियन आणि क्रेन ऑपरेटरसह इतर पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातून दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

वयाची मर्यादाकोचीन शिपयार्ड भरतीसाठी 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.

अर्जासाठी शुल्कया पदांसाठी अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रियाया पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे केली जाणार आहे. ज्यामध्ये 50 गुणांची लेखी परीक्षा असेल तर 50 गुण प्रॅक्टिकलचे असतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीखइच्छुक आणि पात्र उमेदवार 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार