शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

जिवंत पाणीसाठा २,७०० द.ल.घ.मी. : मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर, इंदिरा सागर धरणातील विसर्गाचा लाभ

अहमदाबाद : गुजरातमध्ये मान्सूनचे आगमन नुकतेच झाले असले तरी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आता धरणात १२७.४६ मीटर पाणी असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११ मीटर बाकी आहे.सरदार सरोवराच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे. विशेषत: मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून खाली पाणी येत आहे. आता धरणातील जिवंत पाणीसाठा २,७०० दशलक्ष घनमीटर झाला आहे.सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे संचालक पी. सी. व्यास यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची पातळी १२७.४६ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११.२२ मीटरच बाकी आहे. धरणाची एकूण पाणीधारण उंची १३८.६८ मीटर आहे.गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित असलेल्या सरदार सरोवर धरणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण १३८.६८ मीटर क्षमतेने पाणी आले होते. २०१७ मध्ये उंची वाढविली गेल्यापासून पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.सोडलेले पाणी कोरड्या तलावातव्यास यांनी सांगितले की, वीज निर्मिती केंद्रांतून सोडले जाणारे पाणी धरणाखालील भागातील कोरडे तलाव भरण्यासाठी तसेच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरजही या पाण्यातून भागविली जात आहे.सूत्रांनी सांगितले की, अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे यंदा जूनमध्येच धोऽऽ धो पाऊस पडला आहे. सरदार सरोवराच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे सरोवरात चांगले पाणी आले आहे.वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरूव्यास यांनी सांगितले की, सध्या धरणात ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. नदीपात्रातील तसेच कालव्याच्या तोंडाशी अशा दोन्ही ठिकाणची वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू करण्यात आली आहेत. नदीपात्रातील वीज निर्मिती केंद्रात १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या दोन वीज निर्मिती केंद्रांत १०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. वीज निर्मिती केंद्रांद्वारे ७ हजार क्युसेक्स पाणी नर्मदा मुख्य कालव्यात सोडले जात आहे. तसेच ३३,००० क्युसेक्स पाणी नर्मदा नदीपात्रात सोडले जात आहे.व्यास यांनी सांगितले की, नदीपात्र आणि कालवा मुख या दोन्ही ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांतून सध्या दररोज १७ ते २० दशलक्ष युनिट वीज निर्माण होत आहे. या विजेची दररोजची किंमत ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये आहे.