शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

Sardar Patel's Birth Anniversary : देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 08:44 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे. जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडियात दाखल झाले असून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन असं ट्विट मोदींनी केलं आहे.

गांधीनगर - सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे. जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडियात दाखल झाले असून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून ही सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन असं ट्विट मोदींनी केलं आहे. मोदी येत्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक योजनांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, इको-टुरिझम, जंगल सफाई आदींसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. गेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. तसेच तब्बल 71.66 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत असतात. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन एन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. गेल्या 11 महिन्यांत 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. त्यामुळे राज्याला तब्बल 71.66 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती मिळत आहे. 

पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. तसेच या पुतळ्याचा देखभाल करण्यासाठी दिवसाला 12 लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' साकारण्यात आले आहे. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' हे 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारण्यात आलं असून त्यामध्ये तब्बल 102 प्रजातीची झाडं लावण्यात आली आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रेक्षक गॅलरीतून परिसर नयनरम्य दिसावा यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' मध्ये अनेक दूर्मिळ प्रजातीची झाडं आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासोबत ही सुंदर जागा पर्यटकांना आकर्षित करत आहे.

 

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात